Realme Narzo 20 blue

Tuesday, 11 October 2016

MAHANAGAR PALEKA

 पनवेल नवी महानगरपालिका

पनवेल महापालिका स्थापनेची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली. ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका अस्तित्त्वात आली.
पनवेल नगरपालिकेसह लगतच्या 68 गावांचा महानगरपालिकेत समावेश असणार आहे. पनवेल महापालिका राज्यातील 27 वी महापालिका असेल. तर मुंबई महानगर प्रदेशामधील ही नववी महापालिका ठरणार आहे.
 चार नियोजन प्राधिकरणं
या नव्या महापालिकेत एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि एमआयडीसी ही चार नियोजन प्राधिकरणे आहेत. नवी मुंबईचे विमानतळ हे या नव्या महापालिकेच्या हद्दीत येत नाही.

नव्या पनवेल महापालिकेचे वैशिष्ट्यं:
 * नगरपालिका गावांची लोकसंख्या 5 लाख 95 हजार
महापालिका क्षेत्रात 90 टक्के नोकरीदार-व्यावसायिक
महापालिका क्षेत्रात 10 टक्के कृषिक्षेत्र
नव्या पनवेल महापालिकेचे क्षेत्र 1700 हेक्टर

 महाराष्ट्रातील एकूण महापालिका:


 *मुंबई महानगर प्रदेश*
1. बृह्नमुंबई
2. ठाणे
3. कल्याण-डोंबिवली
4. नवी मुंबई
5. मिरा-भाईंदर
6. उल्हासनगर
7. वसई-विरार
8. भिवंडी-निजामपूर
  *पश्चिम महाराष्ट्र*
9. पुणे
10. पिंपरी-चिंचवड
11. सोलापूर
12. सांगली-मिरज-कुपवाड
13. कोल्हापूर
   *उत्तर महाराष्ट्र*
14. नाशिक
15. मालेगाव
16. अहमदनगर
17. धुळे
18. जळगाव
   *मराठवाडा*
19. औरंगाबाद
20. नांदेड-वाघाळा
21. लातूर
22. परभणी

 *विदर्भ*
23. नागपूर
24. अमरावती
25. अकोला
26. चंद्रपूर

 नवी महानगरपालिका
27. पनवेल


No comments:

Post a Comment