www.onlymissionmpsc.blogspot.in
स्पर्धा परीक्षा देणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये हौशे, गौशे, नौशे असल्यामुळे सगळेच पास होतातच असे नाही. काही जण एक-दोन प्रयत्नातच यशस्वी होतात तर काही जणांना शेवटच्या संधीची वाट पाहावी लागते. जे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात त्यांच्या यशामागे अभ्यासाचे टेक्निक असते, त्यामुळे त्यांना यश मिळते. त्यामुळेच तुमच्यासाठी अभ्यासाच्या काही खास टेक्निक्स...
* लवकर सुरुवात करा : चांगली सुरवात हे अर्ध यश असतं, त्यामुळे तुम्ही जशी सुरुवात करता तसचा शेवट होतो. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी शाळा-कॉलेज पासूनच करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग आदी परीक्षा सोपी बनते.
* बॅक टू द बेसिक्स : आठवी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे आहे. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे ती एक प्रकारचा पाया असतो. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो.
* गणित : गणित हा कठीण वाटणारा विषय आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देऊ शकतो. शाळेत असतानाच गणिताचा पाया मजबूत करायला हवा. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात.
* इंग्लिश : इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय लावून ग्रॅमरकडे लक्ष दिल्यास इंग्लिशमध्ये सुधारणा होते. तसेच इंग्लिश वर्तमानपत्र वाचून हळूहळू लहान-मोठ्या पुस्तके वाचण्यास सुरुवात करावी.
* बुद्धिमत्ता, वाचन आणि सामान्यज्ञान : बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी होय. यासाठी गतिमान आकडेमोड करणे, पाढे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर करावे.
* हस्ताक्षर : हस्ताक्षर हा लेखी सादरीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हस्ताक्षर सुधारण्यास लहानपणापासून सुरुवात करावी. स्पर्धेत टिकायचे असेल तर फक्त ज्ञान असून भागणार नाही, तर त्याचे सादरीकरणही चांगले हवे व त्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही पहिली, तर मुद्देसूद लेखनशैली ही दुसरी पायरी आहे.
* वेळेचा सदुपयोग : प्रत्येक गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इत्यादी बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे.

No comments:
Post a Comment